मनपुर्वक स्वागत

सर्व चाळीसगांव वासीयांचे सर्वप्रथम या आपल्या वेबसाईटवर स्वागत...आणि आपल्या चाळीसगाव विषयीची सर्व माहिती तुमच्या पुढे मांडतो तर माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.....

Friday, 23 March 2012

भावपूर्ण श्रद्धांजली...


भावपूर्ण श्रद्धांजली मा.आरोग्य मंत्री, मा.आ.डॉ.सौ. विमलताई मुंदडा यांचे आज २३ मार्च २०१२ शुक्रवार रोजी सकाळी मुंबईत  दुख:द निधन झाले. ताईन च्या या आकस्मित जाण्याने महाराष्ट्र एका अभ्यासू आणि नेतृत्वक्षम व्यक्तिमह्त्वला मुकला आहे. ताईन मुले महाराष्टात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीही भरून काढू शकत नाही. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंबाजोगाईत अंत्यसंस्कार होणार आहेत. चाळीसगाव इंडिया ग्रुप कडून विमलताईना भावपूर्ण श्रद्धांजली...!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ओम शांती शांती…..

गुढी उभारू आनंदाची...


गुढी पाडवा म्हणजे परिपूर्णतेकडे जाताना आपला आनंद व्यक्त करणे. आनंदाची खूण म्हणून गुढी, ध्वज, उभा करणे. गुढी हा ब्रह्मध्वज.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याला नववर्षारंभ करून आनंदी जीवनाची गुढी उभारूया...
गुढी उभारू आनंदाची, संदेश हा तुम्ही देत चला,
ब्रह्मध्वज हा, प्रजापतीचा, दारावर सजवीत चला.... !! धृ !!

रत्नभूषणे, सुंदर वस्त्रे, अंगावरती झूल असे....
कांतीवरती चमक धनाची, मन अंतरी "क्रुद्ध" असे....
शरीर करुया सुंदर "आतून", मंत्र मुखाने जपत चला....!! १ !!

चला मेळवू मित्र असे जे, संस्कृती रक्षक असतील ते,
जे जे वंचित, आणि उपेक्षित, सहाय्य घेऊन जाऊ तिथे,
सुंदर आयुष्याची कवने, क्षण क्षण तुम्ही रचत चला .....!! २ !!

आज शुभेच्छा, घेऊन आलो, माझ्या जीवन मित्रांनो,
तथास्तु म्हणू दे सुख समृद्धी, स्वर्गामधल्या देवांनो,
भक्तीभावाने स्नेह,प्रेम हे, हृदयावर लेपित चला......!! ३ !!

हे हिंदू नववर्ष तुम्हा सर्व चाळीसगाव वासियांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना


Thursday, 22 March 2012

धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी...

 
आज मृत्युंजय आमावस्या म्हणजेच धर्मासाठी प्राण देणारे धर्मवीर संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी गुडीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजाना ठार करण्यात आल त्यांच्या मुंडकीची गुडी उभारण्यात एक नाही दोन नाही तब्बल बारा दिवस त्यांच्यावर आत्याच्यार करण्यात आले जिभ छाटली डोळे काढले अंगावर तलवारीने रेषा ओढल्यापण पण झुकली नाही मान अखेर मस्तक ताटच होते एवढे अत्याचार सहन केले आणी शेवटी आपले प्राण धर्मासाठी आर्पण केले असे ते महान धर्मवीर पण आम्ही काय केल फक्त आणी फक्त त्यांची विटंबना जर रगेल आणि रंगेल असते तर सहन केल आसत का ? १४० लढाया केल्या राज्यांनी एकही लढाई हरली नाही किवा एकाही लढाईत तह केला नाही.इतिहास एकच नाव सांगतो शंभू राजे
दिसत होते पहाडासारखे ,
चालत होते वाघासारखे ,
या जगात होणार नाही कोणी
छत्रपती संभाजी राजांसारखे
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
 
 

"जागतिक जल दिनानिमित्त"

आयोजित भव्य प्रदर्शन.

विषय- पाणी वाचवा.
ठिकाण- सदानंद पलेस, सिग्नल पोईन्ट,स्टेशन रोड, चाळीसगाव.
वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

आयोजक - श्री. प्रदिपसिंग सत्यवान राजपूत, नगरसेवक आणि
सभापती पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका चाळीसगाव.


Tuesday, 20 March 2012

जागतिक चिमणी दिनविशेष


जर प्रत्येकाने एका झाडाला वाचवायचं ठरवलं तर ते होऊ शकत...जितके झाडं जास्त तितके पक्षी प्राणी जास्त जगतील पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही...पक्षांना पिंजऱ्यात कोंडून ठेवु नका त्यांना मुक्तपणे जगु दया. तसेच पक्ष्यांसाठी थोडे गव्हाचे किवा इतर डाळींचे दाणे आपल्या अंगणात रोज थोडे थोडे फेकावेत तसेच आपल्या पाण्याच्या  बाटलीतून रोज एका झाडाला पाणी घालायचं जरी ठरवलं तरी पाण्याअभावी मरणारी झाड वाचतील झाडांमुळे पक्षी वाचतील.घरी गेल्यावर मोरीत पाणी ओतण्यापेक्षा ते पाणी झाडांना घाला त्यांचा जीव वाचवा. कृपा  करा त्या झाडांची वेदना समजून घ्या.डांबर आणि सिमेंट ह्यात त्यांची मुळ गुदमरत आहेत त्यानाही मोकळा श्वास घेऊ द्या.

Saturday, 17 March 2012

सहकार आणि शिक्षणमहर्षी मा.जिभाऊसो .रामराव दगडू पाटील

 
आपल्या चाळीसगाव मधील एक महान व्यक्ती, चाळीसगावच्या विकासाला संपूर्णपणे हातभार लावणारे, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सहकार आणि शिक्षणमहर्षी मा.जिभाऊसो तथा रामराव दगडू पाटील उर्फ रामराव जिभाऊ. जिभाऊ तालुक्यातील उंबरखेडे या गावाचे, त्यांच्याच कारकिर्दीत  आणि जिभाऊनमुळेच १९५४ मध्ये उंबरखेडे गावाला  आदर्श गाव पुरस्कार मिळाला तो संपूर्ण चाळीसगाव तालुका त्यांच्या कारकिर्दीत आदर्श तालुका होता. ज्ञान,कर्म आणि भक्ती हे श्रीमादभागवत गीतेतील तिन्ही योग भाऊंनी जीवनात उतरवले आणि आचरणात आणले.चाळीसगाव मध्ये  सर्वोदय शिक्षण संस्था, बेलगंगा साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती,शेतकरी सहकारी संघ, शासकीय दुध डेअरी, श्री शिवाजी सोसायटी या सहकारी संस्थांची स्थापना केली. आणि सुरळीत चालावल्यात पण. जिभाऊ म्हणजे चाळीसगाव चा चालता बोलता विकासच होते. जिभाऊ जसे एक उत्कृष्ट राजकारणी होते तसेच एक आदर्श शेतकरी पण होते.बेलगंगा सहकारी साखर कारख्ण्याचे संस्थापक चेअरम, सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन, शेतकी संघाचे चेअरमन, मार्केट कमिटीचे चेअरमन, जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य  म्हणजेच आजचे जिल्हा परिषद सदस्य. जिभाऊ सदस्य असतांना  आज आपण ज्याला मोठा पूल म्हणतो तो बांधला गेला. जिल्हा कॉटन मार्केटिंग जिल्हा बँक आदी संस्थात पारदर्शी  कारभार केला. आपली ८ एकर शेती जिभाऊनी भूदान यज्ञात दान करून सक्रीय सहभाग नोंदवला.
          जिभाऊ जसे राजकारणात तसेच धार्मिक कार्यात पण सक्रीय होते . श्री क्षेत्र वालझेरी, पैठण येथे ते अखेर पर्यंत विश्वस्थ राहिले. जिभाऊ एवढी मोठे असतांनाही स्वतः बैलगाडीवरून  शेतात जात आणि स्वतः काम करीत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी सर्वोदय शिक्षण संस्थेची स्थापना  करून तिच्या शाखा उंबरखेडे, वरखेडे,सायगाव,पिलखोड, कुंझर,खेडगाव,गुढे,धामणगाव या ठिकाणी त्यांचा  विस्तार केला. आणि आज हि त्यांचे शिष्य  आन्नासो उदेसिंग पवार हि संस्था व्यवस्थित आणि  पारदर्शीपणे सांभाळतायेत. जिभाऊनच्या कार्याला चाळीसगाव इंडिया ग्रुप चा सलाम! अश्या या सर्वगुण संपन्न, आदर्श चाळीसगावकर रामराव जिभाऊना चाळीसगाव इंडिया ग्रुप कडून मानाचा मुजरा! आणि त्यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!