मनपुर्वक स्वागत
Sunday, 25 March 2012
मीराबाई पुण्यतिथी निमित्त मिरवणूक आणि पालखी...
वेळ - सायंकाळी ४
वाजता.
संत शिरोमणी प्रेममूर्ती श्री संत मीराबाई...
पग
घुंगरू बांध कर मीरा नाची रे
मै तो मेरे नारायण कि आपही हो गयी दासी रे
लोग कहे मीरा भई रे बावरी न्यात कहे कुलनासीरे
विष का प्याला राणाजी ने भेजा पिबत मीरा हंसी रे
मीरा के प्रभू गिरधर नागर सहज मिले अविनासी रे
मै तो मेरे नारायण कि आपही हो गयी दासी रे
लोग कहे मीरा भई रे बावरी न्यात कहे कुलनासीरे
विष का प्याला राणाजी ने भेजा पिबत मीरा हंसी रे
मीरा के प्रभू गिरधर नागर सहज मिले अविनासी रे
Friday, 23 March 2012
भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली मा.आरोग्य मंत्री, मा.आ.डॉ.सौ. विमलताई मुंदडा यांचे आज २३ मार्च २०१२ शुक्रवार रोजी सकाळी मुंबईत
दुख:द निधन झाले. ताईन च्या या आकस्मित जाण्याने महाराष्ट्र एका अभ्यासू आणि नेतृत्वक्षम व्यक्तिमह्त्वला मुकला आहे. ताईन मुले महाराष्टात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीही
भरून काढू शकत नाही. उद्या
त्यांच्या पार्थिवावर अंबाजोगाईत अंत्यसंस्कार होणार आहेत. चाळीसगाव इंडिया ग्रुप कडून विमलताईना भावपूर्ण श्रद्धांजली...!
ईश्वर त्यांच्या
आत्म्यास चिरशांती देवो ओम
शांती शांती…..
गुढी उभारू आनंदाची...
गुढी पाडवा म्हणजे परिपूर्णतेकडे जाताना
आपला आनंद व्यक्त करणे. आनंदाची खूण म्हणून गुढी, ध्वज, उभा करणे. गुढी हा ब्रह्मध्वज.चैत्र
शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला
सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याला नववर्षारंभ करून आनंदी जीवनाची गुढी उभारूया...
गुढी उभारू आनंदाची, संदेश हा तुम्ही देत चला,
ब्रह्मध्वज हा, प्रजापतीचा, दारावर सजवीत चला.... !! धृ !!
रत्नभूषणे, सुंदर वस्त्रे, अंगावरती झूल असे....
कांतीवरती चमक धनाची, मन अंतरी "क्रुद्ध" असे....
शरीर करुया सुंदर
"आतून", मंत्र मुखाने जपत चला....!! १ !!
चला मेळवू मित्र असे
जे, संस्कृती
रक्षक असतील ते,
जे जे वंचित, आणि उपेक्षित, सहाय्य घेऊन जाऊ तिथे,
सुंदर आयुष्याची
कवने, क्षण
क्षण तुम्ही रचत चला .....!! २ !!
आज शुभेच्छा, घेऊन आलो, माझ्या जीवन मित्रांनो,
तथास्तु म्हणू दे
सुख समृद्धी, स्वर्गामधल्या
देवांनो,
भक्तीभावाने स्नेह,प्रेम हे, हृदयावर लेपित चला......!! ३ !!
हे हिंदू नववर्ष तुम्हा सर्व चाळीसगाव
वासियांना सुखाचे, समृद्धीचे
आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना
Thursday, 22 March 2012
धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी...
आज मृत्युंजय आमावस्या म्हणजेच धर्मासाठी प्राण देणारे धर्मवीर
संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी गुडीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी
महाराजाना ठार करण्यात आल त्यांच्या मुंडकीची गुडी उभारण्यात एक नाही दोन
नाही तब्बल बारा दिवस त्यांच्यावर आत्याच्यार करण्यात आले जिभ छाटली डोळे
काढले अंगावर तलवारीने रेषा ओढल्यापण पण झुकली नाही मान अखेर मस्तक ताटच
होते एवढे अत्याचार
सहन केले आणी शेवटी आपले प्राण धर्मासाठी आर्पण केले असे ते महान धर्मवीर पण आम्ही काय केल फक्त आणी फक्त त्यांची विटंबना जर
रगेल आणि रंगेल असते तर सहन केल आसत का ? १४० लढाया केल्या राज्यांनी एकही लढाई हरली नाही किवा एकाही लढाईत तह केला नाही.इतिहास एकच नाव सांगतो शंभू राजे
दिसत होते
पहाडासारखे ,
चालत होते वाघासारखे
,
या जगात होणार नाही
कोणी
छत्रपती संभाजी
राजांसारखे
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
Tuesday, 20 March 2012
जागतिक चिमणी दिनविशेष

जर प्रत्येकाने एका झाडाला वाचवायचं ठरवलं
तर ते होऊ शकत...जितके झाडं जास्त तितके पक्षी प्राणी जास्त जगतील पर्यावरणाचा
समतोल बिघडणार नाही...पक्षांना पिंजऱ्यात कोंडून ठेवु नका त्यांना मुक्तपणे जगु दया.
तसेच पक्ष्यांसाठी थोडे गव्हाचे किवा इतर डाळींचे दाणे आपल्या अंगणात रोज थोडे
थोडे फेकावेत तसेच आपल्या पाण्याच्या बाटलीतून रोज एका झाडाला पाणी घालायचं
जरी ठरवलं तरी पाण्याअभावी मरणारी झाड वाचतील झाडांमुळे पक्षी वाचतील.घरी गेल्यावर मोरीत पाणी ओतण्यापेक्षा ते
पाणी झाडांना घाला त्यांचा जीव वाचवा. कृपा करा त्या झाडांची वेदना समजून घ्या.डांबर आणि सिमेंट ह्यात
त्यांची मुळ गुदमरत आहेत त्यानाही मोकळा श्वास घेऊ
द्या.
Subscribe to:
Posts (Atom)




