मनपुर्वक स्वागत

सर्व चाळीसगांव वासीयांचे सर्वप्रथम या आपल्या वेबसाईटवर स्वागत...आणि आपल्या चाळीसगाव विषयीची सर्व माहिती तुमच्या पुढे मांडतो तर माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.....

Saturday 17 March 2012

सहकार आणि शिक्षणमहर्षी मा.जिभाऊसो .रामराव दगडू पाटील

 
आपल्या चाळीसगाव मधील एक महान व्यक्ती, चाळीसगावच्या विकासाला संपूर्णपणे हातभार लावणारे, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सहकार आणि शिक्षणमहर्षी मा.जिभाऊसो तथा रामराव दगडू पाटील उर्फ रामराव जिभाऊ. जिभाऊ तालुक्यातील उंबरखेडे या गावाचे, त्यांच्याच कारकिर्दीत  आणि जिभाऊनमुळेच १९५४ मध्ये उंबरखेडे गावाला  आदर्श गाव पुरस्कार मिळाला तो संपूर्ण चाळीसगाव तालुका त्यांच्या कारकिर्दीत आदर्श तालुका होता. ज्ञान,कर्म आणि भक्ती हे श्रीमादभागवत गीतेतील तिन्ही योग भाऊंनी जीवनात उतरवले आणि आचरणात आणले.चाळीसगाव मध्ये  सर्वोदय शिक्षण संस्था, बेलगंगा साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती,शेतकरी सहकारी संघ, शासकीय दुध डेअरी, श्री शिवाजी सोसायटी या सहकारी संस्थांची स्थापना केली. आणि सुरळीत चालावल्यात पण. जिभाऊ म्हणजे चाळीसगाव चा चालता बोलता विकासच होते. जिभाऊ जसे एक उत्कृष्ट राजकारणी होते तसेच एक आदर्श शेतकरी पण होते.बेलगंगा सहकारी साखर कारख्ण्याचे संस्थापक चेअरम, सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन, शेतकी संघाचे चेअरमन, मार्केट कमिटीचे चेअरमन, जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य  म्हणजेच आजचे जिल्हा परिषद सदस्य. जिभाऊ सदस्य असतांना  आज आपण ज्याला मोठा पूल म्हणतो तो बांधला गेला. जिल्हा कॉटन मार्केटिंग जिल्हा बँक आदी संस्थात पारदर्शी  कारभार केला. आपली ८ एकर शेती जिभाऊनी भूदान यज्ञात दान करून सक्रीय सहभाग नोंदवला.
          जिभाऊ जसे राजकारणात तसेच धार्मिक कार्यात पण सक्रीय होते . श्री क्षेत्र वालझेरी, पैठण येथे ते अखेर पर्यंत विश्वस्थ राहिले. जिभाऊ एवढी मोठे असतांनाही स्वतः बैलगाडीवरून  शेतात जात आणि स्वतः काम करीत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी सर्वोदय शिक्षण संस्थेची स्थापना  करून तिच्या शाखा उंबरखेडे, वरखेडे,सायगाव,पिलखोड, कुंझर,खेडगाव,गुढे,धामणगाव या ठिकाणी त्यांचा  विस्तार केला. आणि आज हि त्यांचे शिष्य  आन्नासो उदेसिंग पवार हि संस्था व्यवस्थित आणि  पारदर्शीपणे सांभाळतायेत. जिभाऊनच्या कार्याला चाळीसगाव इंडिया ग्रुप चा सलाम! अश्या या सर्वगुण संपन्न, आदर्श चाळीसगावकर रामराव जिभाऊना चाळीसगाव इंडिया ग्रुप कडून मानाचा मुजरा! आणि त्यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!