मनपुर्वक स्वागत

सर्व चाळीसगांव वासीयांचे सर्वप्रथम या आपल्या वेबसाईटवर स्वागत...आणि आपल्या चाळीसगाव विषयीची सर्व माहिती तुमच्या पुढे मांडतो तर माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.....

Saturday, 31 March 2012

रामनवमीच्या चाळीसगावकरांना हार्दिक शुभेच्छा....

!! जय श्री राम !!

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागातील चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस श्रीरामांचा जन्म झाला.हा दिवस श्रीराम नवमी म्हणून अखंड हिंदुस्थान मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीराम आणि श्रीकृष्ण हिंदू संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात रामाचे नाव कोरलेले आहे. रामरंगी सगळे रंगले आहेत. राम आहे, म्हणूनच भारतीय जनतेत राम आहे. 'श्री राम जय राम जय जय राम' आणि 'गोपालकृष्ण आणि राधेकृष्ण' या त्यांच्या ह्रदयातून येणार्या घोषणा याच्या साक्षीदार आहेत. प्रत्येकाच्या जीवनात राम एकरूप झालेले असून खेडेगावातील दोन व्यक्तींची गाठभेट झाल्यास ते आदराने हात जोडून 'राम राम' असे म्हणतात. 'राम रखे उसे कौन चाखे' या म्हणीप्रमाणे ईश्वराच्या संरक्षण शक्तीत मानवाचा दृढ विश्वास प्रतिबिंबित होतो. 'राम रखे ऐसे रहो' यात राम भक्तांची समर्पण वृत्ती दिसून येते. प्रभूच्या विश्वासावर चालणारा माणूस कोणत्याही नवीन कार्यासाठी 'राम भरोसे' असा शब्द प्रयोग करतो. एखाद्या सुव्यवस्थित आणि संपन्न राज्यासाठी 'राम राज्य' या शब्दाचा वापर केला जातो. आपल्या जीवनात प्रत्येक रूपाने राम एकरूप झालेला आहे. मर्यादा पुरूषोत्तम श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला दुपारी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात झाला होता. लोक राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. कारण, त्यांचा जन्म आणि जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन केले आहे. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरूष 'उत्तम' कसा होऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला 'मर्यादा पुरूषोत्तम रामाच्या' जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना 'मर्यादा पुरूषोत्तम' असे म्हटले जाते. 
                                                    मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा, त्यासाठी महर्षी वाल्मीकी यांनी राम चरित्र लिहले. 'सदगुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम!' हे सर्व गुण स्वत: अंगीकारून प्रत्येकाने राम बनण्याची महत्त्वकांक्षा मनात ठेवावी. रामाची पालखी खांद्यावर घेऊन सर्वजण धन्य होतात. कारण, राम देव संस्कृतीचे संरक्षक होते. राक्षसी संस्कृतीचा नाश करणार्यांना भारतीय जनता डोक्यावर घेऊन नाचते. सामान्य जनतेनेही रामाला आपल्या ह्रदयात चिरंतन स्थान दिले आहे. ही बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे. विश्वामित्र रामाला यज्ञाचे रक्षण करण्यासाठी घेऊन गेला होता. परंतु, तेथे त्यांनी रामाला जीवनाचे शिक्षण दिले. म्हणूनच विश्वामित्राकडून काहीतरी शिकलो असल्याची जाणीव रामाला झाली नाही आणि रामाला आपण शिक्षण दिले असल्याची जाणीय विश्वामित्राला झाली नाही. अशा प्रकारे विश्वमित्र दररोज रामाच्या जीवनात सांस्कृतिक प्रेमरूपी तूप भरत होते. विश्वामित्र रामाजवळ मनमोकळेपणाने बोलत असे. राम आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. रामाला तीन भाऊ होते. परंतु, त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. ज्या कुटूंबात दुसर्याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते. तेथे कधीही भांडणे होत नाहीत. रामाची मातृ-पितृ भक्ती खरोखरच अनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडीलांची आज्ञा त्यांनी आनंदाने पाळली. अशा प्रकारची आज्ञा ऐकून राम जराही डगमगले नाहीत किंवा व्यथित झाले नाहीत. राम वडिलांची एकही आज्ञा टाळत नसत. ते नेहमी प्रसन्न असायचे. ज्या कैकयी मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले. तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवता राम तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते. हा प्रसंग रामाचे व्यक्तिमत्व दर्शवतो. राम आणि सुग्रीव यांची मैत्रीही आदर्श होती. वालीला मारण्यासाठी राम सुग्रीवाला तर रावणाला मारून सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीव रामाला मदत करतो. सुग्रीवावर रामाचे खूप प्रेम होते. त्याला थोडेही दु:ख झाले तरी रामाच्या डोळ्यात अश्रू येत असत. मित्र असावा तर रामासारखा आणि शत्रूही असावा तर रामासारखा असे लोक म्हणत असत. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने अग्नी संस्कार करण्यास नकार दिला होता. 'मृत्यूबरोबर वैर संपत असते. म्हणून आपल्या भावाला अग्नीसंस्कार दे'. 'तू जर हे काम करत नसेल तर मी करतो. रावण जसा तुझा भाऊ होता तसा माझाही होता.' असे तेव्हा रामाने बिभीषणाला सांगितले होते. रामासारखा पती मिळावा, अशी प्रत्येक स्त्री कामना करत असते. रामाचे सीतेवर अमर्याद प्रेम होते.सीताही जन्मोजन्मी रामासारखा पती मिळावा म्हणून कामना करत होती. त्या दृष्टीकोनातून रामाचा सीता त्याग आत्म बलिदानाच्या उच्चतम भावनेचे प्रतीक आहे. रामाला आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती.वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य रामाने बिभीषणाला दिले होते. परंतु, रामाला या राज्याचा मोह झाला नाही. 'दूर्लभं भारते जन्म' ज्या भूमीत जन्म दुर्लभ आहे, त्या भूमीत जन्म मिळाल्यावरच तेथील महानता समजेल? म्हणून रामनवमीच्या निमित्ताने राम चरित्र समजावून ते अंगीकारण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. सर्व हिंदू बांधवाना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्या……

Monday, 26 March 2012

कवी ग्रेस यांना भावपूर्ण आदरांजली...

शब्दांच्या सामर्थ्याने उकलला
अदभूत गहराईचा प्रकाश
सत्याच्या शोधात शब्दांना
मिळवून दिले अवघे आकाश,


सायंकाळच्या संधी प्रकाशात
मनाला स्पर्शले सत्यात
केली परब्रह्म रुपी कविता
अन् ठसले साऱ्यांच्या हृदयात.www.smrutisparsh.blogspot.com



Sunday, 25 March 2012

मीराबाई पुण्यतिथी निमित्त मिरवणूक आणि पालखी...

चाळीसगाव शहरातील जहागीरदार वाडी भागात ७ दिवसापासून अखंड हरीनाम सप्ताह चालू आहे.आज मीराबाई पुण्यतिथी निमित्त मिरवणूक आणि पालखी आहे.आपण अवश्य उपस्थित राहावे.
वेळ - सायंकाळी ४ वाजता.
ठिकाण - हनुमान मंदिर प्रांगण, बामोशी बाबा दर्गा पाठीमागे,जहागीरदार वाडी, कोदगाव रोड,चाळीसगाव.

संत शिरोमणी प्रेममूर्ती श्री संत मीराबाई...

आज चैत्र शुद्ध तृतीय म्हणजेच संत शिरोमणी प्रेममूर्ती श्री संत मीराबाई यांची आज पुण्यतिथी.मीराबाई या राजपूत समाजातील होत्या. त्या महाराणा प्रताप यांच्या काकू तर महाराणा भोजराज यांच्या पत्नी होत्या.आजच्या दिवशी त्या द्वारका येथील मंदिरातील कृष्णमुर्ती मध्ये सदेह विलीन झाल्या.आजच्या दिवशी प्रेममूर्ती संत मीराबाई यांना आमचा मानाचा मुजरा.....!
 

पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे
मै तो मेरे नारायण कि आपही हो गयी दासी रे
लोग कहे मीरा भई रे बावरी न्यात कहे कुलनासीरे
विष का प्याला राणाजी ने भेजा पिबत मीरा हंसी रे
मीरा के प्रभू गिरधर नागर सहज मिले अविनासी रे

Friday, 23 March 2012

भावपूर्ण श्रद्धांजली...


भावपूर्ण श्रद्धांजली मा.आरोग्य मंत्री, मा.आ.डॉ.सौ. विमलताई मुंदडा यांचे आज २३ मार्च २०१२ शुक्रवार रोजी सकाळी मुंबईत  दुख:द निधन झाले. ताईन च्या या आकस्मित जाण्याने महाराष्ट्र एका अभ्यासू आणि नेतृत्वक्षम व्यक्तिमह्त्वला मुकला आहे. ताईन मुले महाराष्टात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीही भरून काढू शकत नाही. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंबाजोगाईत अंत्यसंस्कार होणार आहेत. चाळीसगाव इंडिया ग्रुप कडून विमलताईना भावपूर्ण श्रद्धांजली...!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ओम शांती शांती…..

गुढी उभारू आनंदाची...


गुढी पाडवा म्हणजे परिपूर्णतेकडे जाताना आपला आनंद व्यक्त करणे. आनंदाची खूण म्हणून गुढी, ध्वज, उभा करणे. गुढी हा ब्रह्मध्वज.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याला नववर्षारंभ करून आनंदी जीवनाची गुढी उभारूया...
गुढी उभारू आनंदाची, संदेश हा तुम्ही देत चला,
ब्रह्मध्वज हा, प्रजापतीचा, दारावर सजवीत चला.... !! धृ !!

रत्नभूषणे, सुंदर वस्त्रे, अंगावरती झूल असे....
कांतीवरती चमक धनाची, मन अंतरी "क्रुद्ध" असे....
शरीर करुया सुंदर "आतून", मंत्र मुखाने जपत चला....!! १ !!

चला मेळवू मित्र असे जे, संस्कृती रक्षक असतील ते,
जे जे वंचित, आणि उपेक्षित, सहाय्य घेऊन जाऊ तिथे,
सुंदर आयुष्याची कवने, क्षण क्षण तुम्ही रचत चला .....!! २ !!

आज शुभेच्छा, घेऊन आलो, माझ्या जीवन मित्रांनो,
तथास्तु म्हणू दे सुख समृद्धी, स्वर्गामधल्या देवांनो,
भक्तीभावाने स्नेह,प्रेम हे, हृदयावर लेपित चला......!! ३ !!

हे हिंदू नववर्ष तुम्हा सर्व चाळीसगाव वासियांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना