मनपुर्वक स्वागत

सर्व चाळीसगांव वासीयांचे सर्वप्रथम या आपल्या वेबसाईटवर स्वागत...आणि आपल्या चाळीसगाव विषयीची सर्व माहिती तुमच्या पुढे मांडतो तर माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.....

Friday 23 March 2012

गुढी उभारू आनंदाची...


गुढी पाडवा म्हणजे परिपूर्णतेकडे जाताना आपला आनंद व्यक्त करणे. आनंदाची खूण म्हणून गुढी, ध्वज, उभा करणे. गुढी हा ब्रह्मध्वज.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याला नववर्षारंभ करून आनंदी जीवनाची गुढी उभारूया...
गुढी उभारू आनंदाची, संदेश हा तुम्ही देत चला,
ब्रह्मध्वज हा, प्रजापतीचा, दारावर सजवीत चला.... !! धृ !!

रत्नभूषणे, सुंदर वस्त्रे, अंगावरती झूल असे....
कांतीवरती चमक धनाची, मन अंतरी "क्रुद्ध" असे....
शरीर करुया सुंदर "आतून", मंत्र मुखाने जपत चला....!! १ !!

चला मेळवू मित्र असे जे, संस्कृती रक्षक असतील ते,
जे जे वंचित, आणि उपेक्षित, सहाय्य घेऊन जाऊ तिथे,
सुंदर आयुष्याची कवने, क्षण क्षण तुम्ही रचत चला .....!! २ !!

आज शुभेच्छा, घेऊन आलो, माझ्या जीवन मित्रांनो,
तथास्तु म्हणू दे सुख समृद्धी, स्वर्गामधल्या देवांनो,
भक्तीभावाने स्नेह,प्रेम हे, हृदयावर लेपित चला......!! ३ !!

हे हिंदू नववर्ष तुम्हा सर्व चाळीसगाव वासियांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना


No comments:

Post a Comment